Subscribe Us

फळपीक विम्यासाठी अर्ज सुरु l Application for fruit crop insurance started

 फळपीक विम्यासाठी अर्ज सुरु l Application for fruit crop insurance started

Application for fruit crop insurance started


आठ फळपिकांसाठी २६ जिल्ह्यांत विमा लागू पुणे : मृग बहरासाठी राज्याच्या २६ जिल्ह्यांमधील फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत एक लाखाच्या आसपास फळ उत्पादक सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको असल्यास तसे घोषणापत्र द्यावे लागेल; अन्यथा विमाहप्ता परस्पर कापला जाणार आहे.
fruit crop insurance
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गतच राबविली जाते. संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष अशी फळपिके या योजनेत आहेत. ही विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत सहभागासाठी किंवा भाग न घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज खाते किंवा किसान क्रेडिट कार्ड खाते असलेल्या बँकेत घोषणापत्र द्यावे लागेल. सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र विमा योजनेतील संबंधित पिकाच्या सहभागाच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेत द्यावे लागेल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे, कुळाने भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसह शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहर मिळून अधिकाधिक फक्त चार हेक्टर क्षेत्रमर्यादेपर्यंत विमा नोंदणी राहील, अशी अट टाकण्यात आली आहे. त्यातही पुन्हा केवळ उत्पादनक्षम बागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू असेल. ''fruit crop insurance'

जिल्हानिहाय विमा कंपन्या अशा... • नगर, अमरावती, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, नागपूर जिल्हा : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी (टोल फ्री क्रमांक १८००१०२४०८८, दूरध्वनी क्रमांक ०२२६८६२३००५) • बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर जिल्हा : एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स ( संपर्क १८००२६६०७०० ०२२६२३४६२३४) • बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, धाराशिव जिल्हा : भारतीय कृषी विमा कंपनी (संपर्क १८००४१९५००४, ०२२६१७१०९१२) "fruit crop insurance" संत्रा, द्राक्षाला १४ जून, डाळिंबाला १४ जुलैपर्यंत मुदत विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या https://pmfby. gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. अर्ज भरण्यासाठी बँका, वित्तीय संस्था, ई-सेवा | केंद्रांची मदत घेता येईल. अंतिम मुदत संत्रा, पेरू, , लिंबू, द्राक्षासाठी १४ जूनपर्यंत आहे. मोसंबी व चिकूसाठी ३० जूनपर्यंत, तसेच डाळिंबासाठी १४ जुलैपर्यंत, तर सीताफळासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज भरता येतील, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. (fruit crop insurance)

Post a Comment

0 Comments