Subscribe Us

अश्वगंधा शेतीतून मिळवा सर्वाधिक उत्पन्न | Get the highest yield from, Ashwagandha farming

अश्वगंधा शेतीतून मिळवा सर्वाधिक उत्पन्न l  Ashwagandha farming 

Ashwagandha farming
Ashwagandha farming


    शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्न करत आहे, नवनवीन योजना राबवत आहे. त्यासोबत शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. जेणेकरून शेतकरी आपले उत्पादन वाढवून चांगले जीवन जगू शकतील. औषधी गुणधर्म असलेल्या अशवगंधा ची शेती करून शेतकरी आजकाल चांगलाच नफा मिळवत आहे. 

शेतकरी जो खर्च करत आहे त्याहीपेक्षा कित्येक पटीने नफा देणाऱ्या ह्या अशवगंधा च्या शेतीला कॅश क्रॉप देखील म्हणतात. तर मित्रांनो चला आज अशवगंधा च्या शेतीबद्धल जाणून घेऊया. Ashwagandha farming 

----------------------------------------------------------------

animated-arrow फुलकोबी पीक व्यवस्थापन

       ➥ सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

----------------------------------------------------------------

मित्रांनो अशवगंधा ही अद्वितीय सुगंध आणि ताकत वाढवण्याची क्षमता असलेली एक वनस्पती आहे. त्याचे वानस्पतिक नाव हे विथानिया सोम्निफेरा आहे. महिलांसाठी अशवगंधा खूप फायदेशीर ठरत आहे. अशवगंधा पासून वेगवेगळी औषधे बनवली जातात त्यामुळे अशवगंधा ला कायम मागणी असते. 

जवळजवळ अशवगंधा च्या प्रत्येक भागापासून औषधे बनवली जातात. अशवगंधा च्या बिया, पाने, साल, देठ, मुळे हे मार्केट मध्ये विकले जातात व यास चांगली किंमत ही भेटते. अशवगंधा शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकार योजना राबवत आहे.

◉ तणाव आणि चिंता दूर करण्यात उपयुक्त

अशवगंधा ही सर्व औषधी वनस्पती पैकी सर्वात प्रसिद्ध वनस्पती आहे. अशवगंधा हे एक झुडुपच आहे असे म्हणा ह्याच्या फळापासून, बियापासून व झाडाच्या सालीपासून औषधे तयार केली जातात. अशवगंधा ही एक बहुवर्षीय वनस्पती आहे आणि अशवगंधा च्या मुळाला अश्वासारखा वास येतो म्हणूनच त्याला अशवगंधा असे म्हणतात. तणाव चिंता दूर करण्यासाठी अशवगंधा चा उपयोग करतात आणि ह्याची पावडर मार्केट मध्ये सहज उपलब्ध होते. 

----------------------------------------------------------------

animated-arrowप्रधान मंत्री मुद्रा कर्ज योजना.

        ➥ सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

----------------------------------------------------------------

 अश्वगंधा च्या च्या शेतीसाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ?

तर चिकन माती आणि लाल माती ही अशवगंधा च्या लागवडीसाठी अतिशय योग्य आहे. जमिनीचा PH मूल्य 7.5 ते 8 असावा उत्पादन वाढीसाठी योग्य आहे.अशवगंधा लागवडीसाठी 25 ते 30 डिग्री तापमान असावे आणि 500-700 मिलिमीटर पाऊस असावा. रोपांच्या वाढीसाठी शेतात ओलावा असावा.

 शरद ऋतुमधील एक दोन पावसाळ्यात च अशवगंधा ची मुळे चांगली वाढतात. कमी सुपिकतेच्या जमिनीत व डोंगराळ भागातही अशवगंधा ची लागवड यशवसविरित्या करू शकतो. ('Ashwagandha farming') 

अशवगंधा लागवड

ऑगस्ट महिना हा अशवगंधा च्या पेरणीसाठी योग्य आहे. एक दोन पाऊस झाले की जमीन नांगरून घ्यावी व रोटर च्या साहाय्याने समतोल करावी जमिनीची मशागत करताना सेंद्रिय खत म्हणजे शेणखताचा वापर करावा. आणि अशवगंधा ची पेरणी करावी पेरणीसाठी हेक्ट्री 10 ते 12 किलो बिया योग्य आहेत. बिया पेरून झाल्यावर 7 ते 8 दिवसांनी अंकुर येतात.

पेरणीचे प्रकार

दोन प्रकारे अशवगंधा पिकाची पेरणी केली जाते. पहिली पद्धत म्हणजे रांग पद्धत. ह्यामध्ये दोन रोपांतील अंतर हे 5 सेंमी व दोन ओळीतील अंतर 20 सेंमी ठेवले जाते. दुसरी पद्धत म्हणजे फवारणी पद्धत, ह्यामध्ये हलकी नांगरणी वाळूमध्ये मिसळली जाते आणि शेतात शिंपडले जाते. चौरस मीटरमध्ये तीस ते चाळीस वनस्पती असतात. ("Ashwagandha farming") 

अशवगंधा काढणी

ऑगस्ट च्या पेरणीनंतर जानेवारी ते मार्च मध्ये अशवगंधा ची कापणी केली जाते. झाड उपटून झाड हे मुळापासून वेगळे केले जाते. मुळाचे लहान लहान तुकडे केले जातात, फळापासून बिया व कोरडी पाने वेगळी केली जातात. जवळपास अशवगंधा पासून 50 किलो बिया व 600 ते 800 किलो मूळ मिळतात. औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना आपण थेट अशवगंधा विकू शकतो.

----------------------------------------------------------------

 animated-arrowपिकांवरील पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव व त्यावरील नियंत्रण

        ➥ सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

----------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments